दिवा, मेणबत्ती लावण्याचा कार्यक्रम पंतप्रधानांनी मागे घ्यावा – हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोरोनाबाबत ज्यांचं कौतुक करायच आहे त्यांचं कौतुक हत्तीवरून मिरवणूक काढून करूया पण रविवारी मेणबत्त्या किंवा दिवे लावण्याची गडबड कशासाठी केली जातेय असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय ते कोल्हापूरमध्ये बोलत होते कोरोनाबाबत आजही जनजागृती महत्त्वाची आहे यापूर्वीही थाली वाजवण्याचा कार्यक्रम करण्यात आला त्याला ही गडबड झाली त्यामुळे पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा असही मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलय.

नवी दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तब्लिकसाठी जे मुस्लिम बांधव गेले होते त्यांनी स्वतःहून समोर येऊन तपासणी करून घ्यावी आणि अशा परिस्थितीत असे कार्यक्रम घेऊ नयेत असं मत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलय ते कोल्हापूर मध्ये बोलत होते त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी नमाज देखील मशिदीमध्ये न जाता घरी अदा करावा असही त्यांनी म्हटलय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.