नवी दिल्ली – देशपातळीवर अनेक लोक मदतीसाठी पुढे येत असताना क्रीडा संघटनाही आपली जबाबदारी ओळखून पंतप्रधान सहाय्यता निधीला मदतीचा हात देत आहेत. भारतीय टेबल टेनिस फेडरेशन संघटना (टीटीएफआय) कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. या संघटनेने पंतप्रधान सहाय्यक निधीसाठी पाच लाखांची मदत दिली आहे. आपल्या पत्रकाव्दारे त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीच्या सर्वोच्च संघटनेने म्हणजेच हॉकी इंडियाने 25 लाख रुपयांची मदत केली आहे. करोनामुळे ज्यांना उपचार घ्यायचे आहेत तसेच त्यांच्या जेवणाचा आणि औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी ही मदत दिली असल्याचे संघटनेने सांगितले आहे.