पीएमपी बसने दुचाकीस्वार तरुणीला चिरडल्याने मृत्यू

नोकरीच्या चौथ्याच दिवशी काळाचा घाला

पिंपरी – पिंपळे गुरव येथे पीएमपी बसच्या चाकाखाली चिरडून एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी एकच्या पिंपळे गुरव बस स्थानकावर घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पीएमटी बस चालकाला अटक केली आहे. लक्ष्मी सुनील जगंम (वय-24 रा. मोहननगर, चिंचवड) असे मयत मुलीचे नाव असून गणेश तुकाराम सोंडगे (वय-30) असेट अटक बस चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ही नवी सांगवी येथे एका खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होती. ती कामावर असतानाच तिचा अपघात झाला. लक्ष्मी आपल्या दुचाकीवरून रस्ता ओलांडत असचाना तिची गाडी बसच्या आडवी आली. बस वेगात असल्याने ती बसच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आली. या अपघातात तिच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला. लक्ष्मी ही तिची आई व भावासह चिंचवड येथे राहत होती. अवघ्या चार दिवसांपूर्वीच नवी सांगवी येथे तिला सेल्स व मार्केटिंगमध्येच नोकरी मिळाली होती. मात्र नव्या नोकरीच्या चौथ्याच दिवशी तिच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍तकेली जात आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.