PM Modi On india Aghadi : जातीच्या नावावर देशाला चिथावणी देणारे आणि भांडण लावण्यावर विश्वास ठेवणारे इंडिया आघाडीचे लोक दलित आणि वंचितांसाठीच्या प्रत्येक योजनेला विरोध करतात आणि आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी जातीच्या नावावर राजकारण करतात. त्यामुळे जातीच्या नावावर भडकावणाऱ्यांपासून सावध रहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
वाराणसी येथे सीर गोवर्धनपूर येथील संत रविदास जन्मस्थान मंदिरात दर्शन आणि पूजेनंतर गुरूंच्या ६४७ व्या प्रकाश पर्व सोहळ्याला संबोधित करताना मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी, अखिल भारतीय रविदास धर्म संघटनेचे उपाध्यक्ष नवदीप दास आदी उपस्थित होते. | PM Modi On india Aghadi
मोदी पुढे म्हणाले की, बनारस आज मिनी पंजाबसारखा दिसत आहे. तुमच्याप्रमाणेच रविदासजी मला पुन्हा पुन्हा त्यांच्या जन्मस्थानी बोलावत असतात. येथे आल्याने आपले संकल्प पुढे नेण्याची आणि लाखो अनुयायांची सेवा करण्याची संधी मिळते. काशीचा खासदार या नात्याने बनारसमध्ये तुमचे स्वागत करणे आणि तुमच्या सुविधांची विशेष काळजी घेणे ही माझी विशेष जबाबदारी आहे. | PM Modi On india Aghadi
मोदी म्हणाले की, एखाद्या कुटुंबावर आधारित पक्ष कोणत्याही दलित किंवा आदिवासींना त्यांच्या कुटुंबाबाहेर जाऊ देऊ इच्छित नाहीत. देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती होण्यास कोणी विरोध केला, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. हे तेच घराणेशाहीचे पक्ष आहेत, ज्यांना निवडणुकीच्या वेळी अचानकपणे दलितांची आठवण येऊ लागते. त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. गरीब, वंचित, मागासलेले आणि दलितांसाठी आमच्या सरकारचे हेतू स्पष्ट आहेत.
मोदी म्हणाले की, संत रविदासजींच्या जन्मभूमीच्या विकासासाठी आज अनेक कोटींच्या योजना सुरू केल्या जात आहेत. मंदिराकडे जाणारे रस्ते, इंटरलॉकिंग ड्रेनेज व्यवस्था, संतसंग भवन आणि प्रसाद घेण्यासाठी विविध सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना केवळ आध्यात्मिक आनंदच मिळणार नाही तर इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते संत रविदास यांच्या नवीन पुतळ्याचे लोकार्पण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी त्यांनी गाडगे महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. | PM Modi On india Aghadi
मोदी असेही म्हणाले की, गेल्या १० वर्षात विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. पूर्वी गरीबांना सर्वात शेवटचे मानले जायचे, आज सर्व योजना त्यांच्यासाठी बनवल्या जात आहेत. कोरोनाच्या इतक्या मोठ्या संकटात आम्ही ८० कोटी गरीब लोकांसाठी मोफत रेशनची व्यवस्था केली.आम्ही स्वच्छ भारत योजना मोहीम सुरू केली, प्रत्येक कुटुंबाला शौचालयाचा लाभ दिला.