WPL 2024 Live Streaming & Broadcast : महिला प्रीमियर लीग आजपासून सुरू होत आहे. या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स ( #MIvDC ) यांच्यातील सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिला हंगाम जिंकला होता. यावेळी, मुंबई इंडियन्स आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरेल.
Hello from the Chinnaswamy Stadium, Bengaluru 👋
It’s nearly time for the #TATAWPL Season 2 opener 🥳
Who are you rooting for❓ #MIvDC pic.twitter.com/gQUX4F6Zoa
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट कधी, कुठे आणि कसे पाहू शकाल?
चाहत्यांना जिओ सिनेमावर महिला प्रीमियर लीग सामन्यांचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) पाहता येणार आहे. जिओ सिनेमावर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग असेल. जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी चाहत्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही, म्हणजेच ते ते विनामूल्य पाहू शकतील. तसेच स्पोर्ट्स18 वर थेट प्रक्षेपण पाहता येईल.
या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष्य…
गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स संघात यास्तिका भाटिया, नॅट सीव्हर ब्रंट, पूजा वस्त्राकर, इसी वोंग आणि शबनीम इस्माईल सारखे दिग्गज खेळाडू असतील. तर दिल्ली कॅपिटल्स संघात शेफाली वर्मा, मेग लॅनिंग, जेमिमाह रॉड्रिग्स आणि ॲलिस कॅप्सी सारखे महान खेळाडू आहेत.
मुंबई इंडियन्स संघ-
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नाट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, जिंतीमनी कलिता, अमनदीप कौर, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, एस सजना, कीर्तन बालकृष्णन आणि फातिमा जाफर.
दिल्ली कॅपिटल्स संघ-
शफाली वर्मा, मेग लॅनिंग (सी), जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, शिखा पांडे, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, पूनम यादव, तितास साधू, मिन्नू मणी, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, अरुंधती रेड्डी , अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल आणि स्नेहा दीप्ती.