शिक्रापूर -निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील काळे वस्ती येथे विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेवर बसलेल्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. वनविभागाच्या वतीने या मोराचा पंचनामा करून दहन करण्यात आले असल्याची घटना घडली आहे.
निमगाव म्हाळुंगी येथील काळे वस्ती येथे एका विजेच्या खांबावर बसलेल्या मोराला विजेचा धक्का लागून मोर खाली पडला असल्याचे येथील नागरिकांना दिसून आले, त्यांनतर पोलीस पाटील किरण काळे यांनी वन विभागाच्या वनरक्षक अनिता होले यांना माहिती दिली. होले यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट दिली असता त्यांना एक नर जातीचा मोर मृत अवस्थेत आढळून आला.
मृत मोराचा पंचनामा करून तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय कार्यालय येथे मोराचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांनतर या मोराचे दहन करण्यात आले आहे; परंतु 15 दिवसांपूर्वी तळेगाव ढमढेरे येथे मोराचा उष्माघाताने मृत्यू झाला असताना आता पुन्हा निमगाव म्हाळुंगी येथे विजेच्या धाक्य्याने मोराचा मृत्यू झाला असल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.