वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याचा ठराव अमेरिकन प्रतिनिधीगृहात बुधावरी मंजूर झाला. हा ठराव 228 विरूध्द 193 मतांनी पक्षीय भेदाबेद बाजूला सारून मंजूर करण्यात आला, असे वृत्त न्युयॉर्क टाईम्स या दैनिकाने दिले आहे.
सभापती नान्सी पेलोसी यांनी या ठरावाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. यासोबत ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल करणारे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांचे सात ठराव मांडण्यात आले. अमेरिकेच्या इतिहासातील महत्वाचा अडथळा आपण आज ओलांडत आहोत, असे पेलोसी यांनी हा ठराव मांडण्यापुर्वी सभागृहात सांगितले.
यातून काय निष्पन्न हवयचे असेल ते होईल. मात्र, यामुळे ट्रम्प यांच्यावर आयुष्यभर संशय व्यक्त केला जाईल.
कायद्याची पायमल्ली करून अमेरिकन कॉंग्रेसमध्ये (संसद) आणल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर सभागृहात महाभियोग दाखल करण्यात आला होता. सुमारे 40 कोटी अमेरिकन डॉलर्स एवढ्या लष्करी सहाय्य जाहीर करत युक्रेनवर डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार जो बिडेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याचा आक्षेप आहे.
ट्रम्प यांना पदावर ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय आता ट्रम्प यांच्या रिपब्लीकन पक्षाचे बहुमत असणाऱ्या सिनेटमध्ये होईल. रिपब्लिकन सिनेट नेते मिच मॅकोनल म्हणाले,आज (गुरूवारी) दुपारी हा ठराव पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर त्याचे वरीष्ठ सभागृहात वाचन होईल. त्याच्या सुनावणीस मंगळवारी सुरवात होईल.
ट्रम्प यांनी मात्र या निकालाचा खरमरीत भाषेत समाचार घेतला आहे. डेमोक्रॅट पक्षाचा रडीचा डाव, असे वर्णन करत ते म्हणातात, अमेरिकन जनतेला सिनेटमध्ये याची स्वच्छ सुनावणी अपेक्षित आहे. पण निराश झालेल्या नॅन्सी आणि भ्रष्ट राजकारणी अशी स्वच्छ सुनावणी होऊ देतील? हा कॉंग्रेसच्या इतिहासातील सर्वात एकतर्फी आणि अयोग्य निर्णय आहे.