मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष पदी अभिषेक शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अभिषेक पाटील यांचे सहकार्य राहिल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.