अभिनेत्री परिणीत चोप्राचा आगामी “द गर्ल ऑन द ट्रेन’ या थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. डायरेक्टर रिभू दासगुप्ताच्या या चित्रपटाची काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू आहे. या टीझरमध्ये परिणीती चोप्राचा हटके अंदाज दिसून येत आहे. यातील तिच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट 26 फेब्रुवारीला ऑनलाइन रिलीज करण्यात येणार आहे. यात परिणीती चोप्रासह कीर्ति कुल्हारी आणि अदिती राव हैदरी मुख्य भूमिका साकारत आहेत. “द गर्ल ऑन द ट्रेन’ या नावानेच असलेल्या इंग्रजी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. हा सस्पेंस थ्रिलर चित्रपट मे-2020मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, करोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने तो लांबणीवर पडला. आता तो चित्रपटगृहांऐवजी ऑनलाइन रिलीज करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात परिणीती चोप्रा ही अशा एका मुलीची भूमिका साकारत आहे, जी दररोज रेल्वेने प्रवास करत असते आणि एक दिवस ती एका विचित्र परिस्थितीत सापडते. हा चित्रपट याच नावाने पॉला हॉकिंस यांनी लिहिलेल्या इंग्रजी कादंबरीवर आधारित आहे. इंग्रजी चित्रपटात परिणीति चोप्राची भूमिका अभिनेत्री इमिली ब्लंट हिने साकारली होती.