आजचे भविष्य (गुरुवार, दि. १४ जानेवारी २०२१)

मेष : प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. विवाहोत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

वृषभ : या सप्ताहात सर्व काही ठीकठाक असूनही तुम्हाला असुरक्षित असल्याची भावना सलत राहील.

मिथुन : व्यवसायात कामाचा व्याप व विस्तार वाढेल. पैशाचे बाबतीत तुम्ही अत्यंत भावनाशील असता.

कर्क : कामगारांना खुश ठेवण्यासाठी विशेष सवलती व प्रलोभने द्यावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

सिंह : नोकरीत कामाचे योग्य नियोजन व त्याला कृतीची जोड लाभ घडवून देईल. वरिष्ठांना महत्त्व कळेल.

कन्या : घरात प्रियजनांच्या हौसेसाठी पैसे खर्च करावे लागतील. महिलांनी प्रकृ तीची काळजी घ्यावी.

तूळ : घरात नवीन खरेदीचे बेत ठरतील. आवक कमी व खर्च जास्त असा सध्या तुमचा ताळेबंद असेल.

वृश्‍चिक : थोडी निराशा व काळजी वाटेल. परंतु कामाची योग्य आखणी केलीत तर त्यातून बाहेर पडू शकाल.

धनु : व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून वेळेत खुबीने करून घ्या.

मकर : क्षमतेपेक्षा जास्त काम स्वीकारू नका. म्हणजे त्रास होणार नाही. नोकरीत कामात गुप्तता राखा.

कुंभ : बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक कुवत ओळखून निर्णय घ्या.

मीन : नवीन नोकरी स्वीकारताना तडजोड करावी लागेल. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नवीन धाडस कराल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.