मुंबई : जगभरात कोरोना व्हायरस व्हायरस धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रातही पाच रुग्ण सापडले आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाय सांगितला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या कि, करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी केवळ मास्क पुरेसे नाहीत. तापमान वाढत नाही तोपर्यंत जिथे शक्य आहे तिथे लोकांना घरुन काम करायला सांगण्यास काय हरकत आहे. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी परीक्षेचा कालावधी वगळता शाळा-कॉलेजेसचा सुट्टी दिल्यास काय हरकत आहे. कमी लोकं बाहेर पडले तर कमी गोंधळ होईल आणि यंत्रणांना काम करणे सोप्प जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
To prevent corona only mask is not enough also till temperature rises enough why can’t we let ppl work from home where ever possible n shut schools colleges except exams to avoid spreading ..Less ppl out in numbers less chaos n helpful to handling agencies ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2020
दरम्यान, पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची मुलगी, विमानात त्यांचा सहप्रवासी, टॅक्सी ड्रायव्हर यांची तपासणी केली असता त्याचे नमुनेही पॉझिटिव्ह आले आहेत. अवघ्या 12 तासांत करोनाचे 5 रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली असून, अन्य देशासह पुण्यातही हा विषाणू पसरू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे