पॅनकार्ड हा आज एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. पॅनकार्ड शिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही. प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठी ते आवश्यक बनले आहे. बँकेपासून ते कार्यालयापर्यंत कोणतेही आर्थिक काम तुम्ही त्याशिवाय करू शकत नाही. आता सर्वत्र पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पॅन कार्डशी संबंधित चुकांसाठी तुम्हाला 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. यासाठी खालील बाबींची दखल घेने महत्वाचे आहे. तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. 1 एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही हे आज करु शकला नाहीत तर उद्या म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून तुम्हाला त्यानंतर दंड भरावा लागू शकतो.
दोन पॅन कार्ड असल्यास होणार अडचण
तुम्ही कुठेही पॅन क्रमांक टाकत असाल तर पॅन कार्डवर दिलेला दहा अंकी पॅन क्रमांक काळजीपूर्वक भरा. यामध्ये कोणत्याही स्पेलिंगमध्ये चूक किंवा नंबर बदलल्यास तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. त्याचवेळी, तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असले तरीही तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तुमचे बँक खाते देखील गोठवले जाऊ शकते. म्हणून, जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील, तर तुमचे दुसरे पॅनकार्ड ताबडतोब पॅन विभागाकडे जमा करा. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B मध्येही यासाठी तरतूद आहे.
अशा प्रकारे तुम्ही दुसरे पॅन कार्ड करू शकता जमा
पॅन जमा करण्याची प्रक्रिया सोपी आहे. यासाठी एक सोप्पा अर्ज आहे. हा अर्ज आयकर विभागाच्या वेबसाइटवर देण्यात आला असून तेथून तो डाउनलोड करू शकता येतो. यासाठी वेबसाइटवर जाऊन ‘Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. यानंतर, अर्ज भरून तो अर्ज कोणत्याही NSDL च्या कार्यालयात जमा करू शकता.
या अर्जासोबत दुसरे पॅन कार्ड सुद्दा जमा करता वेळी द्यायचे आहे. ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता. तसेच एकाच पत्त्यावर एकाच व्यक्तीच्या नावाने येणारी दोन भिन्न पॅन कार्डे या श्रेणीत येतात. तुमच्याकडेही दोन पॅनकार्ड असतील तर एक जमा करावे लागणार आहे. अन्यता तुम्हाला आयकर विभागाकडून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.