PAN Card Reprint : बँक खाते उघडण्यापासून ते आयकर रिटर्न भरण्यापर्यंत ‘पॅन कार्ड’ (PAN Card) हे एक महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. हे जवळजवळ सर्व कामांसाठी आवश्यक असते. गुंतवणुक करताना, मालमत्ता खरेदी करताना दस्तऐवज पुरावा म्हणूनही याचा वापर सगळीकडे केला जातो. त्यामुळे पॅनकार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे.
पॅन कार्ड (PAN Card) दीर्घकाळ वापरल्याने ते खराब होणे किंवा हरवणे या सारख्या अनेक गोष्टी आपल्या सोबत घडतात. मात्र, आता काळजी करू नका. तुम्ही दुसरे पॅन कार्ड सहज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पॅन कार्ड (PAN Card) तुमच्या दारात पोहोचवले जाईल. यासाठी तुम्हाला 50 रुपये इतके छोटे शुल्क द्यावे लागेल.
किती फी भरावी लागेल?
अनेक वेळा स्थानिक दुकानदार दुसरे पॅनकार्ड छापण्यासाठी 100 ते 200 रुपयांची मागणी करतात, परंतु NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही फक्त 50 रुपये देऊन पुन्हा पॅन कार्ड प्रिंट करू शकता.
पॅन कार्ड कसे मिळवायचे…
1. Google वर जा आणि PAN कार्ड रीप्रिंट करा.
2. NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला पॅन कार्ड रिप्रिंट करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
3. वेबसाइटला भेट द्या आणि पॅन कार्ड नंबर, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखे पॅन कार्ड तपशील काळजीपूर्वक भरा.
4. अटी आणि शर्ती स्वीकारा आणि सबमिट करा.
5. तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यावर तुमच्या पॅन कार्डशी संबंधित सर्व माहिती लिहिलेली असेल. पुढे जाण्यापूर्वी ते पुन्हा एकदा तपासून घ्या.
6. पडताळणी केल्यानंतर, OTP वर क्लिक करा.
7. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा.
8. साइट OTP पडताळणीसाठी विचारेल, ते करा.
9. नवीन पॅन कार्ड मिळविण्यासाठी 50 रुपये शुल्क भरा.
10. पॅन कार्ड फी भरण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा UPI वापरू शकता.
11. पेमेंट केल्यानंतर, तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड 7 दिवसांच्या आत तुमच्या घरी येईल.