नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्धमान यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला.
भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आली आहे. २०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला, त्यामध्ये वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते.
Delhi: Wing Commander (now Group Captain) Abhinandan Varthaman being accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind, for shooting down a Pakistani F-16 fighter aircraft during aerial combat on February 27, 2019. pic.twitter.com/CsDC0cYqds
— ANI (@ANI) November 22, 2021
त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उपस्थिती दर्शवली आहे.
अभिनंदन यांनी पाकिस्तानवरुद्धच्या हवाई संघर्षादरम्यान दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आज राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये सन्मान झाला.