रामल्ला, (पॅलेस्टाईन) – पॅलेस्टिनी प्राधिकरणाने नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पॅलेस्टिनी प्राधिकरणामध्ये सुधारणा केल्या जाव्यात अशी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवरून होऊ लागल्यामुळे हे नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. (Palestinian Authority announces a new Cabinet amid Israeli assault on Gaza)
सुमारे दोन दशकांपासून पॅलेस्टाईन ऍथोरिटीचे नेतृत्व करणारे आणि पॅलेस्टाईनवर संपूर्ण नियंत्रण ठेवणारे पॅलेस्टिनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी गुरुवारी नवीन सरकारची घोषणा केली. या नवीन सरकारमधील कोणीही सदस्य सुपरिचित नाही.
दीर्घकाळापासूनचे कार्यकर्ते मोहम्मद मुस्तफा यांना या महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र विचारसरणीचे, अमेरिकेतून शिक्षण घेतलेले आणि अर्थतज्ञ असलेल्या मुस्तफा यांनी गाझाच्या पुनर्बांधणीत मदत करण्यासाठी स्वतंत्र सरकार स्थापन करण्याचे आणि स्वतंत्र ट्रस्ट फंड तयार करण्याचे वचन दिले होते.
पॅलेस्टाईन ऍथोरिटीकडून इस्रायलचे नियंत्रण असलेल्या वेस्ट बँक या भागाचे प्रशासन देखील बघितले जाते. हमासने २००७८ मध्ये गाझाचे नियंत्रण घेतले, तेंव्हा पॅलेस्टाईन ऍतोरिटीच्या सैन्याला तेथून हालकलून लावण्यात आले होते. त्यामुळे गाझामध्ये आता या सरकारचे काहीही नियंत्रण नाही.
गाझामध्ये सध्या सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर तेथील प्रशासन सांभाळण्यासाठी पॅलेस्टाईन एथोरिटीमध्ये सुधारणा केली जावी, अशी मागणी अमेरिकेच्यावतीने करण्यात आली होती. इस्रायलने ही कल्पना नाकारली आहे. इस्रायलकडूनच आता गाझावरील खुले सुरक्षा नियंत्रण ठेवले जाईल, असे म्हटले जात आहे.