लाहोर – पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनेक संघांनी तसेच खेळाडूंनी काही सट्टेबाजी करत असलेल्या कंपन्यांशी करार केले आहेत. हे समोर आल्यावर आता या लीगला सट्टेबाजीचेही ग्रहण लागल्याचेही बोलले जात आहे. इतककेच नव्हे तर पाकिस्तानमध्ये बेटिंग, सेरोगेट जाहिराती करणे तसेच सट्टेबाजांशी किंवा हे उद्योग करत असलेल्या कंपन्यांशी करार करणे इस्लामिक कायद्यानुसार गुन्हा ठरवला गेला आहे. असे असतानाही हा प्रकार समोर आल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
या लीगमधील तीन संघांवर ऑनलाइन बेटिंग, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सरोगेट जाहिरातींचा प्रचार करणे व इस्लामिक कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे संघ या कंपन्यांनी तयार केलेल्या जर्सी परिधान करत आहेत. तसेच त्यांच्या जर्सीवर या सट्टेबाजीशी संबंधित कंपन्यांचे लोगोही लावण्यात आले आहेत. तसेच या संघातील खेळाडू या कंपन्यांच्या जाहिरातीही करत आहेत. त्यामुळेच आता पाक मंडळाने याची गंभीर दखल घेतली आहे.
पाकिस्तानमध्ये कोणत्याही स्वरूपात बेटिंग आणि जुगार खेळण्यावर बंदी आहे. मात्र, काही काळापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या सगळ्याला संमती दिल्याचेही सांगितले जात आहे. यावेळी त्याचा रोख मंडळाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांच्यावर असल्याचेही बोलले जात आहे. या मौनामुळे सर्व फ्रॅंचायझींना या सट्टेबाजी कंपन्यांशी करार करण्याची परवानगी मिळते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/kl-rahul-chances-for-rahul-despite-repeated-failures-venkatesh-prasad-furious/
वाहिन्यांवरूनही सट्टेबाज कंपन्यांच्या जाहिराती
या लीगचे सामने दाखवणाऱ्या काही वाहिन्यांवरही या कंपन्यांच्या जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. या जुगार आणि सट्टेबाजी कंपन्यांशी संबंधित जाहिरातींसह अनेक ऑनलाइन वेबसाइट्सवर लीगचे नावही वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पाकिस्तानचा माजी कसोटी कर्णधार रशीद लतीफ यानेच मंडळावर आता हे आरोप केले आहेत.