Pakistan Cricket Board :- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांनी शनिवारी वयाच्या 89 व्या वर्षी लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला. शहरयार खानच्या मृत्यूला पीसीबीने दुजोरा दिला आहे.
शहरयार खान यांचे भारतातल्या भोपाळच्या नवाब घराण्याशी थेट नाते आहे. शहरयार यांची आई बेगम आबिदा सुलतान या भोपाळच्या राजकुमारी होत्या. ते नात्याने शहरयार खान हे टायगर पतौडी यांचे मावस भाऊ व अभिनेता सैफ अली खान यांचे काका होते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-gtvmi-match-5-will-mumbai-gujarat-rain-know-weather-conditions-of-ahmedabad/
डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2006 आणि ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत सहरयार यांनी पीसीबीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. शहरयार यांनी 1999 च्या भारत दौऱ्यात आणि आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2003 दरम्यान पाकिस्तान पुरुष संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम केले होते.