Salman Butt Pakistan Cricket Board : विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक समस्या वाढल्या आहेत. बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. यानंतर मंडळातही अनेक बदल झाले. महत्त्वाची बाब म्हणजे मंडळात सुरू असलेला गोंधळ अजूनही थांबलेला नाही. पीसीबीने वहाब रियाझला मुख्य निवडकर्ता बनवले. यापूर्वी इंझमाम उल हक यांनी मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. मॉर्ने मॉर्केलही पायउतार झाला होता.
त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अन् मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यांनी मॅच फिक्सिंगच्या आरोपात जेलमध्ये हवा खाऊन आलेला सलमान बट याला पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर मंडळावर प्रचंड टीका सुरु झाली. अखेर पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर अखेर मंडळाने बटला या पदावरून हटवण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष वहाब रियाज यांचा सल्लागार म्हणून बटची नियुक्ती करण्यात आली होती. पाकिस्तानकडे अनुभवी व स्वच्छ प्रतिमा असलेल्या खेळाडूंची कमतरता नाही. वादात अडकलेल्या तसेच मॅच फिक्सिंगच्या आरोपात तुरुंगात जाऊन आलेल्या बटची नियुक्ती कशी केली गेली, अशी विचारणाही त्यांचा माजी कसोटीपटू व समालोचक रमीज राजा यांनीही केली होती व मंडळाने त्याला पदावरून हटवल्यावर समाधानही व्यक्त केले आहे. मंडळाचे अध्यक्ष रियाज यांनीही बटच्या नियुक्तीला विरोध केला होता.
तेरा वर्षांपूर्वी स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमानवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संकटात सापडले होते. सलमानमुळे पीसीबीला पुन्हा एकदा टीकेला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावर चाहत्यांनी वहाब रियाझवर टीकाही केली. त्यामुळे अवघ्या 24 तासांत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपला निर्णय बदलावा लागला.