Mitchell Jonshon on David Warner Retirement : पाकिस्तानविरुद्धच्या मायदेशात होत असलेल्या मालिकेद्वारे डेव्हीड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असला तरीही त्याचा सन्मान करावा इतकी त्याची पात्रता नाही. तो एक गुन्हेगार असून त्याचा सन्मान करणे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला कसे काय वाटते, असा प्रश्न ऑस्ट्रेलियाचाच माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व गोलंदाज मिचेल जॉन्सन याने केला आहे. तसेच त्याने वॉर्नरला गुन्हेगार म्हणूनही संबोधले आहे.
२०१८ साली वॉर्नरवर चेंडू कुरतल्याचा आरोप झाला होता व त्यात तो दोषी असल्याचेही सिद्ध झाले होते. त्याच्यावर एक वर्षाची बंदीही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने लावली होती. मग अचानक तो सन्मानजनक कसा होऊ शकतो. त्याने गुन्हा केला व देशाच्या क्रिकेटला काळीमा फासला. अशा डागाळलेल्या खेळाडूचा केवळ निवृत्त होणार असल्यामुळे सन्मान करणे योग्य नाही. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने त्याला सन्मानजनक निरोप दिला तर तो ऑस्ट्रेलियाच्याच माजी खेळाडूंचा अपमान ठरेल. वॉर्नरच्या हातून जे घडले होते त्याला पाच वर्षे झाली आहेत मात्र, त्यामुळे आमच्या क्रिकेटपटूंबाबतचा संशय अद्याप दूर झालेला नाही, असेही जॉन्सन म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना सातत्याने नवनव्या वादांना सामोरे जावे लागते. हे अत्ताच सुरु झाले असे नाही मात्र, वॉर्नरने जेव्हा चेंडू कुरतडला होता, तेव्हापासून यात वाढ झाली आहे. कोणत्याही देशाविरुद्ध खेळताना सध्याच्या संघातील सर्व खेळाडूंवर एक मानसिक दडपण असते व त्याला वॉर्नरच कारणीभूत आहे. मी त्याच्यासह अनेक वर्षे खेळलो परंतू त्याला त्याच्या हातून घडलेल्या गुन्ह्याचा अजिबात पश्चाताप होत नाही हे मी पाहीले आहे. त्याचा अहंकार कायम असून तो सहकारी खेळाडूंशी संवाद साधतानाही ते जाणवते. त्याच्याकडे निवृत्ती घेत असलेला दिग्गज खेळाडू म्हमून पाहीले जाते याचेच मला आश्चर्य वाटते, असेही जॉन्सनने म्हटले आहे.
गार्ड ऑफ ऑनर देऊ नये
वॉर्नर कसोटी क्रिकेटला अलविदा करत असला तरीही त्याला ऑस्ट्रेलियाच्या संघाने गार्ड ऑफ ऑनर देऊ नये. जर तसे घडले तर तो चुकीचा पायंडा पडेल. खेळाडू कीती मोठा आहे हे पाहिले जाऊ नये त्याने गुन्हा काय केला आहे ते पाहीले जावे. प्रतिमा स्वच्छ असलेल्यांचा सन्मान केला जातो देशाची प्रतिमा मलिन करणार्यांचा नव्हे, असेही जॉन्सन म्हणाला.