नवी दिल्ली :- पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी भारतातील अनुभवांबाबत तसेच भारतीय पाठीराख्यांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत आयसीसीकडे तक्रार केली होती. मात्र, ही तक्रार आयसीसीने फेटाळली आहे. एखाद्या व्यक्तीने गैरवर्तन केले असल्यास त्यावर कारवाई करता येते मात्र, मोठ्या गटाकडून काही घोषणाबाजी झाली असेल तर त्यावर कारवाई करणे शक्य नसते, असे सांगत आयीसीसीने पाकच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी पाकिस्तानचा फलंदाज महंमद रिझवानला उद्देषून काही टोमणे मारले होते. तसेच पाक संघ पराभूत झाल्यावर ड्रेसिंग रुमकडे परतत असताना काही शेरेबाजीही केली होती. त्याबाबत आयसीसीने बीसीसीआयला समज देत प्रेक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती, मात्र आयसीसीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
पाकचा माजी क्रिकेटपटू कनेरियाची अश्रफवर टीका…
#CWC2023 #INDvPAK : “पाठीराखे नव्हते त्यामुळे पराभव, हे सांगणेच हास्यास्पद” कनेरियाची अश्रफवर टीका…
दरम्यान, भारताविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यावर मायदेशी परतलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्यावर पाकिस्तानच्याच माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दानीश कनेरिया याने टीका केली आहे. संघातील खेळाडूंची कामगिरी सुमार झाली. याची कारणे शोधण्यापेक्षा अश्रफ अन्य कोणती सबब देत दोष करत आहेत. त्यांनी आधी आपल्या संघाचे समिक्षण करावे, असा सल्ला दिला आहे. तसेच कनेरियानं पुढं म्हटले आहे की, सामना भारतात होत असताना तो देखील परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध मग त्यावेळी घरचे चाहतेच मैदानात जास्त संख्येने उपस्थित राहणार. मग आपल्या संघाला पाठीराखे नव्हते त्यामुळे आमचा पराभव झाला हे सांगणेच हास्यास्पद आहे.
काय होती तक्रार…
झका अश्रफ यांनी भारतातून पाकमध्ये दाखल होताच त्यांनी मंडळाच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेतली व भारतात आलेल्या अनुभवांचे कथन करत थेट आयसीसीकडे तक्रार केली आहे. पाकिस्तानचा भारताविरुद्धचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला गेला, त्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज महंमद रिझवानसह अन्य खेळाडूंना भारतीय पाठीराख्यांकडून झालेल्या शेरेबाजीला सामोरे जावे लागले.
#CWC2023 #INDvPAK : पाकमध्ये दाखल होताच PCB चे अध्यक्ष अश्रफ यांचे रडगाणे, ICCकडे केली तक्रार…
तसेच पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना भारतीय दुतावासाने वेळेत व्हीसा दिला नाही त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सगळे भारतीय संघाचेच पाठीराखे असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे आमचा पराभव झाला असे झका अश्रफ यांनी म्हटलं आहे. तसेच पाक संघ पराभूत झाल्यावर ड्रेसिंग रुमकडे परतत असताना काही भारतीय पाठीराख्यांनी शेरेबाजीही केली होती. त्याबाबत आयसीसीने बीसीसीआयला समज देत प्रेक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.