PAK vs NZ 1st T20 : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑकलंडमधील ईडन पार्क येथे शुक्रवारी 12 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या T20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव केला. या विजयासह किवींनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा T20I सामना आता रविवार, 14 जानेवारी रोजी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे होणार आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यजमान संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 226 धावा केल्या. डॅरेल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मिशेलने 27 चेंडूत (4 चौकार आणि 4 षटकार) 61 धावा केल्या तर विल्यमसनने 42 चेंडूत नऊ चौकाराच्या मदतीने 57 धावा केल्या. याव्यतिरिक्त सलामीवरी फिन ऍलनने 15 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सने 11 चेंडूत 19 धावा तर मार्क चॅपमनने 11 चेंडूत 26 धावांची खेळी केली.
पाकिस्तानच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि नवोदित अब्बास आफ्रिदी या दोघांनीही प्रत्येकी तीन बळी घेतले असले तरी दोघांनीही भरपूर धावा दिल्या. शाहीनने चार षटकांत 51 तर अब्बासने 34 धावा दिल्या. हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी यांनाही प्रत्येकी 2 यश मिळाले.
New Zealand win the first T20I by 46 runs.#NZvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/C0kuK9F9ed
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 12, 2024
प्रत्युत्तरात विजयासाठी 227 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ संपूर्ण षटकही खेळू शकला नाही आणि 18 षटकांत 180 धावा करून सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून माजी कर्णधार बाबर आझमने 35 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 57 धावा केल्या. याव्यतिरिक्त सलामवीर सैम अयुबने 8 चेंडूत 27 धावा, मोहम्मद रिझवानने 14 चेंडूत 25 धावा तर इफ्तिखार अहमदने 17 चेंडूत 24 धावा केल्या.
न्यूझीलंड संघाकडून टीम साऊदीने 4 षटकात 25 धावा देत 4 बळी घेतले. T20I मध्ये 150 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. अॅडम मिलने आणि बेन सियर्स यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर इसिस सोधीने एक विकेट घेतली.