\n

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, 34 वर्षीय आमिर जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. आमिर हा अपंग क्रिकेटपटू असून तो वाघमा गावातील आहे. आमिर आतापासून नव्हे तर 2013 पासून व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे. आमिरच्या शिक्षकाने त्याच्यातील क्रिकेट टॅलेंट ओळखले होते, त्यानंतर त्यांनी आमिरला पॅरा क्रिकेटची ओळख करून दिली.

\n
\n

#WATCH | Anantnag, J&K: 34-year-old differently-abled cricketer from Waghama village of Bijbehara. Amir Hussain Lone currently captains Jammu & Kashmir’s Para cricket team. Amir has been playing cricket professionally since 2013 after a teacher discovered his cricketing talent… pic.twitter.com/hFfbOe1S5k

\n

— ANI (@ANI) January 12, 2024

\n

\n

आमिर सांगतो की, वयाच्या आठव्या वर्षी एका अपघातात त्याला दोन्ही हात गमवावे लागले. लहान असताना तो वडीलांच्या लाकूड कापण्याच्या कारखान्यात डब्बा द्यायला गेला होता. त्यावेळी कारखान्यातील यंत्रामध्ये त्याचे जॅकेट अडकल्यामुळे त्याचा अपघात झाला अन् त्याने दोन्ही हात गमावले. पुढे तो सागंता की, तो काळ आठवून त्यांचे कुटुंबीय भावूक होतात. पण, आज त्याला पॅरा संघाचे नेतृत्व करताना पाहून ते आनंदी होतात.

\n

कोणीही केली नाही मदत तरी….

\n

आमिर सांगतो की, ‘अपघातानंतर मी आशा सोडली नाही आणि मेहनत घेतली. मी स्वतः सर्व काही करू शकतो आणि मी कोणावरही अवलंबून नाही. माझ्या अपघातानंतर मला कोणीही मदत केली नाही. सरकारनेही मला साथ दिली नाही पण माझे कुटुंब कायम माझ्यासोबत होते.

\n

बांगलादेश विरुद्ध खेळला आंतरराष्ट्रीय सामना…

\n

त्याने पुढे सांगितले की, त्याला हातांशिवाय खेळताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. कर्णधार हुसैन पुढे म्हणतो, ‘मी 2013 मध्ये दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळलो आणि 2018 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळलो. त्यानंतर मी नेपाळ, शारजा आणि दुबई येथे क्रिकेट खेळलो. मला माझ्या पायाने गोलंदाजी करताना आणि खांदा-मानेच्या साह्याने फलंदाजी करताना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Amir Hussain (Armless Cricketer) (@amir_hussain_lone)

\n
\n
\n

\n

क्रिकेट खेळण्याची ताकद दिल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आहेत. तो सांगतो की, तो जिथे जिथे क्रिकेट खेळायला जातो तिथे त्याचे खूप कौतुक होते. आमिर म्हणाला, “माझ्या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि मला वाटते की माझ्या मेहनतीचे फळ मिळाले त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. पायांनी गोलंदाजी करणे खरोखरच कठीण आहे, परंतु मी सर्व कौशल्ये आणि तंत्रे शिकलो आहे. मी प्रत्येक काम माझ्या हिमंतीवर आणि स्वतः करतो आणि करत आहे.

\n

आयुष्याच्या प्रवासावर चित्रपट…

\n

पिकल एंटरटेनमेंटने त्याच्यावर एक चित्रपट बनवत असल्याचे आमिरने सांगितले. तो सांगतो की “पिकल एंटरटेनमेंट माझ्यासाठी एक चित्रपट बनवत आहे आणि लवकरच तारीख जाहीर केली जाईल. मी एका शोमध्ये गेलो होतो जिथे बॉलिवूड अभिनेता विकी कौशल देखील होता आणि तो देखील माझ्या भेटीमुळे थक्क झाला आणि त्याने आमिर हुसैनचा बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली.

\n

सचिन आणि विराट हे आवडते खेळाडू

\n

आमिर हुसेन लोन म्हणतो की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे त्याचे आणि त्याच्या संघाचे आवडते खेळाडू आहेत आणि देवाची इच्छा असेत तर तो त्यांना लवकरच भेटेल.

\n

आमिरच्या क्रिकेट कौशल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच क्रिकेट चाहत्यांना त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है.’ त्यामुळे आता या ओळी जम्मू काश्मीरच्या एका क्रिकेटपटूने खऱ्या करून दाखवल्या आहेत यावरून हे दिसून येते.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Inspirational story : क्रिकेटची इतकी आवड की दोन्ही हात नसतानाही करतो फलंदाजी-गोलंदाजी! जाणून घ्या, कोण आहे ‘तो’ क्रिकेटर अन् पहा Video…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/amir.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/jammu-kashmir-para-cricket-captain-amir-hussain-lones-inspirational-journey#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/amir.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/jammu-kashmir-para-cricket-captain-amir-hussain-lones-inspirational-journey#webpage","name":"Inspirational story : क्रिकेटची इतकी आवड की दोन्ही हात नसतानाही करतो फलंदाजी-गोलंदाजी! जाणून घ्या, कोण आहे ‘तो’ क्रिकेटर अन् पहा Video…","url":"https://www.dainikprabhat.com/jammu-kashmir-para-cricket-captain-amir-hussain-lones-inspirational-journey","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/jammu-kashmir-para-cricket-captain-amir-hussain-lones-inspirational-journey#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/amir.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/jammu-kashmir-para-cricket-captain-amir-hussain-lones-inspirational-journey#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/jammu-kashmir-para-cricket-captain-amir-hussain-lones-inspirational-journey","name":"Inspirational story : क्रिकेटची इतकी आवड की दोन्ही हात नसतानाही करतो फलंदाजी-गोलंदाजी! जाणून घ्या, कोण आहे ‘तो’ क्रिकेटर अन् पहा Video…"}}]}}}

Inspirational story : क्रिकेटची इतकी आवड की दोन्ही हात नसतानाही करतो फलंदाजी-गोलंदाजी! जाणून घ्या, कोण आहे ‘तो’ क्रिकेटर अन् पहा Video…