नवी दिल्ली – “रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला 94 व्या अकॅडमी ऍवॉर्डससाठी सवोत्कृष्ठ माहितीपटाचे नामांकन मिळाले आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस ऍन्ड सायन्सच्या ट्विटर अकाऊंटवर ही नामांकने जाहीर करण्यात आली.
रितू थॉमस आणि सुमित घोष या नवोदित दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या “रायटिंग विथ फायर’ या माहितीपटामध्ये “खबर लहारिया’ या दलित महिलेकडून चालवल्या जाणाऱ्या भारतातील एकमेव दैनिकाची माहिती देण्यात आली आहे.
माहितीपटांच्या श्रेणीमध्ये अन्य 4 माहितीपटांना नामांकन प्राप्त झाले आहे. पुरस्कार वितरण समारंभ 27 मार्च रोजी होणार आहे.