रणवीर आलियाच्या ‘गली बॉय’ ची ऑस्करसाठी निवड

नवी दिल्ली – जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचा, त्यातील कलाकारांचा, तंत्रज्ञान आणि संगीताच सर्वोच्च सन्मान करणारे व्यासपीठ म्हणजे ऑस्कर पुरस्कार होय.याच ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनासाठी भारताच्या वतीने ‘गली बॉय’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.हा चित्रपट पाठवण्याची घोषणा इंडियन फिल्म फेडरेशनने शनिवारी केली.

या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या प्रतिष्ठित अकॅडमी अवॉर्ड्ससाठी बेस्ट फिचर फिल्म विभागामध्ये गली बॉयचे नामांकन होईल. झोया अख्तर हिने दिग्दर्शित केलेल्या या ‘गली बॉय’ चित्रपटाला मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सव २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. यावेळी ऑस्कर पुरस्काराठी २७ चित्रपट शर्यतीत होते. मात्र सर्वानुमते गली बॉयची निवड करण्यात आल्याचे एफएफआईचे सचिव सुपर्ण सेन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.