जिया खानच्या मृत्यूचे गूढ उलगडणार? 

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिचा मृत्यू होऊन सहा वर्ष झाली. ३ जून २०१3 रोजी जियाने राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंरत जियाचा कथित प्रेमी सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. दरम्यान, जिया खानच्या मृत्यूचे गूढ उलगडणार असून लवकरच तिच्यावर आधारित आता एक डॉक्युमेंट्री बनविण्यात येणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, लोकप्रिय ब्रिटिश टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर जियाच्या मृत्यूवर डॉक्युमेंट्री तयार करण्याची योजना बनवली आहे. डॉक्युमेंट्रीचे शूटिंग सुरु झाले आहे. तीन भागात ही डॉक्युमेंट्री बनविण्यात येणार आहे.

दरम्यान, राम गोपाळ वर्मांच्या निशब्द या चित्रपटातून जिया खानने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यानंतर गजनी आणि हाऊसफुल हे दोन सुपरहिट चित्रपटही तिने दिले. परंतु, २५ व्या वर्षीच जियाने आत्महत्या केली. १० जून २०१९ रोजी जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला अटक करण्यात आली. परंतु, उच्च न्यायालयाने सूरजला जामीन दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.