नवी दिल्ली – 95 व्या ऑस्कर ऍवॉर्डसाठी नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे आणि यावर्षीचा गोल्ड ग्लोब ऍवॉर्डस् जिंकलेल्या “नाटु नाटु’ गाण्याला मूळ गाण्यांच्या श्रेणीत ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही ऐतिहासिक कामगिरे मानली जाते.
आर आर आर या चित्रपटासह त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेसह विक्रमी पुरस्कार जिंकले आहेत. आता हे गाणे चार नामांकित गाण्यांशी स्पर्धा करेल – टेल इट लाइक अ वुमनमधील क्लॅप्स, लेडी गागाज होल्ड माय हॅंड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, रिहानाचे लिफ्ट मी अप फ्रॉम ब्लॅक पॅंथर: वाकांडा फॉरएव्हर आणि दिस इज ए लाइफ फ्रॉम एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ऍट वन्स ही ती अन्य गाणी आहेत.
याशिवाय दोन भारतीय-निर्मित माहितीपट देखील ऑस्करसाठी जाणार आहेत – ऑल दॅट ब्रेथ्सला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म आणि द एलिफंट व्हिस्परर्सला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले आहे.