फलटण – शेखर शरद खताळ आणि अक्षय बाळकृष्ण माने या दोघांना फलटण तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.
शेखर शरद खताळ (वय ३०, रा. कापडगाव,ता. फलटण) आणि अक्षय बाळकृष्ण माने (वय २२, रा. शिवाजी वाचनालयाजवळ शंकर मार्केट फलटण) यांच्याविरोधात फलटण उपविभागीय कार्यालयात हद्दपार प्रस्ताव प्राप्त झाले होते.
याबाबत पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्याकडील चौकशी अहवालानुसार हद्दपार करण्याबाबतची सुनावणी प्रक्रिया पार पडून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशाने फलटण व वाई उपविभाग हद्दीतून शेखर खताळ आणि फलटण उपविभाग हद्दीतून अक्षय माने यांना पुढील सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिले आहेत.