जामिया प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
दिल्ली : विरोधी पक्षाने आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या नेतृत्वात विरोधकांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना भेटण्यासाठी गेले होते. विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याची चैकशी करण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपाटीकडे केली.
जामिया वादावर दिल्लीतील राजकारण चांगलेच तापलेले आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा सर्व स्तरातून विरोध होताना दिसत आहे. हे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले असून, विरोधकही सरकारवर टीका करीत आहे.
देशाच्या अनेक भागात नागरिकत्व कायद्याबाबत संघर्ष सुरू आहे. आसाम, बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये बर्याच ठिकाणी हिंसक निदर्शने होत आहेत. आज दिल्लीतील सीलमपूरमध्ये धुमश्चक्री झाली. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली असून अनेक गाडयांना आगी लावण्यात आल्या आहे.