पुणे – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे यंदा १९ वे वर्ष आहे. या उपक्रमाचे उद् घाटन पक्ष्ाचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी अध्यक्षस्थानी होते.
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, कैलास कदम, काँग्रेसचे दत्ता बहिरट, पूजा आनंद, माजी महापौर दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, चंद्रशेखर कपोते, युवक काॅंग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रफीक शेख, सुनील मलके, प्रशांत सुरसे, रोहन सुरवसे आदी उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, संधी असतानाही सोनिया गांधी यांनी पदाचा त्याग करत, डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. जनतेच्या सेवेचे कर्तव्य त्यांनी बजावले. त्यांच्या या त्याग, सेवा व कर्तव्य भावनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. उल्हास पवार यांनी समारोपाचे भाषण केले. प्रशांत सुरासे यांनी सूत्रसंचालन, प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.