भारतीय सैन्यात अधिकारी बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी लष्कराने लष्करी नर्सिंग सेवेद्वारे शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी व्हेकन्सी निघाली आहे. या पदाला सैन्यात एसएससी अधिकारी असेही म्हणतात. भारतीय लष्करातील या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. https://exams.nta.ac.in/SSCMNS वर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
लष्कराच्या या भरती प्रक्रियेतून एकूण 200 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला २६ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येईल. तुम्हालाही सैन्यात अधिकारी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
भारतीय सैन्यासाठी वयोमर्यादा
26/12/2023 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, उमेदवारांचा जन्म 25 डिसेंबर 1988 ते 26 डिसेंबर 2002दरम्यान झालेला असावा.
अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc (Nursing)/PB B.Sc केलेले असावे. (नर्सिंग)/B.Sc. (नर्सिंग) मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, राज्य नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत परिचारिका आणि नोंदणीकृत दाई असल्याचे प्रमाणपत्र असावे. सशस्त्र दलासाठी लागू असलेल्या मानकांनुसार वैद्यकीय तंदुरुस्ती निश्चित केली जाईल.
भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांना मिळणारा पगार
प्री-कमिशन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना लेफ्टनंट पद दिले जाते. ते एमएनएस पे मॅट्रिक्सनुसार पूर्ण वेतन आणि भत्ते मिळण्यास पात्र आहेत. त्यांना 56100 ते 1,77,500 रुपये पगार दिला जातो. याशिवाय, त्यांना अतिरिक्त लाभ मिळतात, ज्यात रेशन, निवास आणि इतर संबंधित सुविधांचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक
https://exams.nta.ac.in/SSCMNS
या परीक्षा द्याव्या लागतात
लेखी परीक्षा
मुलाखत
कागदपत्रांची पडताळणी
वैद्यकीय चाचणी