मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना रणावत’ आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे टीकेची धनी ठरली आहे. कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती.
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://t.co/5V1VQLSxh1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020
मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यावरून अनेकांनी कंगनाला सुनावलं आहे. तर काहींनी तिला पाठिंबा देखील दर्शवला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊतयांनी “कंगना रणावतने महाराष्ट्राची माफी मागितली, तर मी विचार करील…” असं म्हटलं आहे. आज (दि. 6) प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी कंगना संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.
अगर वो लड़की (कंगना रनौत) महाराष्ट्र से माफी मांगेगी(मुंबई को लेकर दिए बयान पर) तो मैं सोचूंगा: कंगना रनौत को लेकर दिए बयान पर माफी मांगने के सवाल पर शिवसेना नेता संजय राउत pic.twitter.com/sK0kWFgIgK
— ANI_HindiNews (@AHindinews) September 6, 2020
तसेच, राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वर एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे कंगनावर निशाणा साधला आहे. “मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ…” असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
जय महाराष्ट्र!!! pic.twitter.com/vbqTMG0KQ5
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 6, 2020