उर्वरित व्यक्ती दुर्धर विकाराने करोनाला बळी
पुणे – शहरात रविवारपर्यंत करोनामुळे मरण पावलेल्या 248 पैकी फक्त 45 जणांचे करोनामुळे निधन झाले आहे. उर्वरित बहुतांश जण वाढत्या वयासोबतच, न्यूमोनिया, मधुमेह, लिव्हर फेल्युअर, हृदयरोग आणि अशा गंभीर रोगांमुळे प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे करोनाला ते बळी पडले, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेमध्ये सोमवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सभागृहनेते धीरज घाटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनु गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. शहरातील परिस्थितीची माहिती घेतली.