मंचर – लौकीयेथे मुंबईवरून आलेली एक व्यक्ती होम क्वारंटाइन असताना मंचर येथील चांडोली रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान गणेश डावखर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या शिनोली येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 27 वर्षीय तरुणाच्या विरोधात घोडेगाव पोलिसांनी रविवारी (दि. 24) गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली. तर पोलीस जवान शांताराम गणपत सांगडे यांनी फिर्याद आहे. पुढील तपास पोलीस जवान वाय. एस. भोजने करीत आहेत.