नगर -प्रत्येक्ष शिकविणे आणि शिकणे या जोडीला आता आधुनिक साधन साहित्यांचा उपयोग करुन ऑनलाईन शिक्षण प्रणाली रुजत आहेत. हिंद सेवा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय हे देखील आपल्या अध्यायना पद्धतीत बदल करीत आहे. लॉकाडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन प्रयोग करीत आहे. या ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत पालकांचा समावेश देखील होत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या विकासात होणार आहे. वाईटातून चांगले घडण्याची ही सुरुवात असावी असे, सीताराम सारडा विद्यालयाचे अध्यक्षक प्रा.मकरंद खेर म्हणाले.
सीताराम सारडा विद्यालयाच्यावतीने लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला आहे. विद्यार्थ्यांपर्यंत रोजचा अभ्यास पोहचावा, त्यांनी सोडविलेल्या गृहपाठाची नोंद आपल्याकडे हावी, यासाठी व्हॅटसअप ग्रुप, ब्रॉडकास्ट लिस्ट, फेसबुक ग्रुप, गुगल लिंक, यु-ट्युब यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. यासाठी विद्यालयातील शिक्षक ऑनलाईन वर्गासाठी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमासाठी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.