नगर -पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाला आहे. सोमनाथ ढेपे (रा. वडगाव गुप्ता, नगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिकअप (क्र. एमएच- 37 जे- 1251) चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास वसंत शेरकर (रा. सारसनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई शिवारात हा अपघात झाला. पिकअप चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुचाकीला (क्र. एमएच- 17 डी- 9206) पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेले सोमनाथ ढेपे रोडवर पडले.पिकअप चालकाला ब्रेक न लागल्याने सोमनाथ यांना मार लागला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार पठाण करीत आहे.