पुणे: सोलारीस क्लब तर्फे रावेतकर करंडक 16 वर्षांखालील सोलारीस क्लब अखिल भारतीय अजिंक्यपद सिरीज टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत देशातील 150 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा सोलारीस क्लब, कोथरूड येथे शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस होणार होणार आहे.
सोलारीस क्लबचे सीईओ हृषिकेश भानुशाली यांनी सांगितले की, या स्पर्धेव्दारे शिष्यवृत्ती पारितोषिके व इतरही आकर्षक बक्षिसे, प्रशस्तिपत्रक व करंडक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय स्पर्धेतील विजेत्यांना 15 गुण, उपविजेत्याला 10, उपांत्य फेरीतील खेळाडूला 7 तर, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला 5 गुण मिळणार आहेत.