साखर निर्यातीला तीन महिन्यांची मुदत वाढ

नवी दिल्ली – चालू वर्षात साखर कारखान्यांना साखर निर्यातीचा जो कोटा दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे साखर कारखाने डिसेंबरपर्यंत निर्यात करू शकतील.

सप्टेंबर 2020 पर्यंत साखर कारखान्यांना 6 दशलक्ष टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती. यापैकी 5.7 दशलक्ष निर्यातीचे कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाले आहेत.

लॉकडाऊनच्या काळामध्ये वाहतूक व्यवस्थेत अडथळे आल्यामुळे ही साखर परदेशात पाठविण्यात अडचणी आल्याचे साखर कारखान्यांनी म्हटले होते. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अन्न मंत्रालयाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.