नगर – करोना च्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री. नवनाथ पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून, रविवारी प्रस्थानच्या दिवशी गावातच नवनाथांच्या पादुकांचे विधीवत पूजा करण्यात आली. तसेच स्व.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत व टाळ मृदंगाच्या गजरात वृक्षरोपण करण्यात आले.
गावातील संत शिरोमणी सावता महाराज व ग्रामदैवत बिरोबा मंदिराच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी विठ्ठल महाराज खळदकर, विणेकरी भाऊसाहेब जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, एकनाथ डोंगरे, लक्ष्मण चौरे, अनिल डोंगरे, सुरेश आंधारे, सदाशिव बोडखे, शुभम खळदकर, साहेबराव बोडखे, चंदू जाधव, संदीप डोंगरे, बन्सी जाधव, पोपट भगत, दिगंबर जाधव, नामदेव भूसारे, रामदास वाखारे, विठ्ठल फलके, गोरख गायकवाड, संतराम जाधव, रंजना दुश्मन, रुक्मिणी पुंड, द्वारका येणारे उपस्थित होते.
विठ्ठल महाराज देशमुख व महामंडलेश्वर काशीनाथ पाटील यांच्या आर्शिवादाने विठ्ठल महाराज खळदकर, संतोष महाराज कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गावातून या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, करोना महामारीमुळे या वर्षी हा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून, दिंडी प्रस्थानच्या दिवशी पादुका पूजन व वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.