बेल्हे -बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. 23) एका 16 वर्षीय युवतीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे गावाची करोनाची रुग्ण संख्या 3 वर तर तालुक्याची संख्या 43वर पोहोचली आहे.
बोरी गावातील 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 8 अहवाल निगेटिव्ह आले असून या एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या युवतीवर लेण्याद्री येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
बोरी गाव व आजूबाजूचा पाच किलोमीटर परिसर प्रशासनाने सील केला आहे, अशी माहिती जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर व बोरी गावचे तलाठी राजू बडे यांनी दिली.