आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. आता तिची जीभ अभिनेत्री तापसी पन्नूबद्दल बोलताना घसरली असून तापसी ही शी- मॅन असल्याचे तिने सांगितले आहे. सोशल मीडियात तिच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उडाल्यानंतर तिने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
ट्विटरवरील एका ट्विटमध्ये अभिनेत्री कंगना राणावतची अभिनेत्री तापसी पन्नू ही स्वस्त कॉपी असल्याचे म्हटले होते. त्यावरून तिच्यावर टीकादेखील करण्यात आली होती. कंगनाची जीभ त्या ट्विटला रिप्लाय देताना घसरली. कंगना म्हणाली की, आज शी मॅन खूप खूश असेल, त्यावर कंगनाने स्माईली इमोजीही टाकली होती.
आता कंगनाच्या या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. तिच्याकडून असल्या ट्विटची अपेक्षा नसल्याचे अनेकांनी सांगितले. आपल्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता कंगनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आणखी एका ट्विटच्या माध्यमातून कंगना म्हणाली की शी मॅन असणे काही चुकीचे आहे का? मला वाटते की तापसीच्या मजबूत लूकची ही स्तुती आहे, तुम्ही नकारात्मक का विचार करत आहात, हे मला समजत नाही.