सैफ अली खान सध्या आपल्या प्रतिमेच्या अगदी विपरीत रोलदेखील बिनदिक्कतपणे स्वीकारतो आहे. आता त्याने प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या जीवनावरील सिनेमामध्ये डॉ. भाभा यांचा रोलदेखील स्वीकारला आहे, असे
समजते आहे.
View this post on Instagram
या सिनेमामध्ये डॉ. भाभा यांचा 1960 च्या दशकात झालेल्या विमान अपघातातील गूढ मृत्यूच्या अनुषंगाने प्रेक्षकांसमोर आणले जाणार आहे.
View this post on Instagram
रिलायन्स एन्टरटेन्मेंटचे प्रॉडक्शन असलेल्या या सिनेमाचे शीर्षक “असॅसिनेशन ऑफ होमी’ असे ठरले आहे. सैफ अली खानने डॉ. होमी भाभा यांच्या लीड रोलला होकार दिल्यावर आता इतर भूमिकांसाठी कलाकार निवडले जायला लागले आहेत.
View this post on Instagram
डॉ. भाभा यांचा मृत्यू विमान अपघातात झाला. मात्र, त्यामागील नेमके कारण कधीच समजू शकलेले नाही. या सिनेमात डॉ. भाभा यांच्या जीवनातील अनेक रहस्यमयी घटनांवर प्रकाश टाकला जाण्याची शक्यता आहे.