मुंबई – राज्यात शनिवारी दिवसभरात आणखी 2940 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर 99 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील करोना रुग्णांची संख्या 65 हजार 168 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 2197 रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.
आज राज्यात 1 हजार 84 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आत्तापर्यंत 28 हजार 81 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 34 हजार 881 ऍक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातला करोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता 17.5 दिवस झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट अर्थात रोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.7 टक्के एवढे आहे.
सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारंटाइन आहेत. तर 35 हजार 420 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. संस्थात्मक क्वारंटाइनसाठी 72 हजार 681 बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत, अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.