जिल्ह्यातील रुग्ण संख्या पोहचली ५१६ वर
सातारा(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत शनिवारी रात्री उशिरा ३२ रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५१६ झाली आहे.
जिल्ह्यातील विविध करोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या ३२ जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तांबवे (ता. फलटण) येथील ९४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. मृत्यू पश्चात स्त्राव तपासणी घेतले होता . तो आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५१६ झाली आहे.
या बाधित रुग्णांमध्ये तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत.
जावळी तालुक्यातील बेलावडे येथील २ पुरुष व २ महिला. निपाणी येथील १ पुरुष व १ महिला. काटवली येथील १ पुरुष. गवडी येथील १ महिला. रांजणी येथील १ महिला.
सातारा तालुक्यातील वावदरे येथील १ पुरुष. खडगाव येथील १ महिला. कुसवडे येथील १ पुरुष.
खटाव तालुक्यातील बनपुरी येथील ४ पुरुष व १ महिला. वांझोळी येथील २ पुरुष व ३ महिला. पाचवड येथील १ पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील कटापूर येथील १ पुरुष. शिरंबे येथील १ पुरुष.
कराड तालुक्यातील खराडे येथील १ पुरुष २ महिला.
पाटण तालुक्यातील तामिणे येथील २ पुरुष.