Nitin Gadkari । पंतप्रधानपद आणि नितीन गडकरी यांच्याविषयीच्या चर्चा नेहमीच होत असतात. नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतात असे वारंवार म्हटले गेले आहे. दरम्यान, याच चर्चांवर नितीन गडकरींनी उत्तर दिलंय.
पंतप्रधानपदाबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. याविषयी बोलताना गडकरींनी,‘ मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीही नव्हतो. मी आज जो काही आहे, तसा ( त्या परिस्थितीत) मी संतुष्ट आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी दृढ विश्वासाने काम करतो, ‘ असे स्पष्ट मत नितीन गडकरींनी मांडले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
राजकारणात करिअर बनवण्यासाठी आलो नाही Nitin Gadkari ।
यावेळी त्यांनी अनेक विषयावर उत्तर दिली. कोणत्याही मतभेदाच्या बातम्यांना त्यांनी त्यांच्या उत्तरातून पूर्णविराम दिला. मी राजकारणात करिअर बनवण्यासाठी आलो नाही. मी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून काम करतो. संघ स्वयंसेवक म्हणूनच राहणे पसंत करतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, हिशोब तपासत बसणारा नेता मी नाही.असे त्यांनी म्हटले.
मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ
“सबका साथ सबका विकास” यावर माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे अतिशय उत्तम काम करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
फडणवीसांसोबतच्या नात्यावरही भाष्य Nitin Gadkari ।
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये काही मतभेद आहेत. काही मुद्यांवर आमचं एकमत नाही अशा अफवा पसरवल्या जातात. फडवणीस यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मी त्यांच्या वडिलांची भेट घेऊन चर्चा केली होती. जेव्हा एकाच क्षेत्रात दोन मोठे लोक असतील तर अशा अफवा पसरवल्या जातात. मी अशा प्रकरणांमध्ये पडत नाही. माझी याबाबत कोणती तक्रार देखील नसते. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील माझा सल्ला घेतात. फायदा-तोट्याचा विचार करून निर्णय घ्या, असंच मी त्यांना सांगतो, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
Nitin Gadkari । नितीन गडकरी स्पष्टच बोलले,’आज गावागावांत गरीब, मजूर, शेतकरी दु:खी…विकास झालाय पण…”