Electoral Bond Hearing । इलेक्टोरल बाँड प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इलेक्टोरल बाँडच्या युनिक नंबरच्या खुलाशाबाबत सुनावणी करताना स्टेट बँक ऑफ इंडियाला आज पुन्हा फटकारले. मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान,”एसबीआयला कोणतीही लपवाछपवी न करता प्रत्येक आवश्यक माहिती द्यावी लागेल” असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एसबीआयला चांगलेच फटकारले. यावेळी न्यायालयाने, ‘निर्णयामध्ये हे स्पष्ट होते की सर्व तपशील उघड करणे आवश्यक आहे. काहीही निवडक नसावे. आदेशावर अवलंबून राहू नका, असेही न्यायालयाने म्हटले आहे. SBI ने संपूर्ण माहिती का जाहीर केली नाही? असा सवालदेखील न्यायालयाने यावेळी केला. न्यायालयाने, “सर्व काल्पनिक तपशील उघड केले पाहिजेत. तसेच एसबीआयचे प्रमुख न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास बांधील आहेत” म्हणत न्यायालयाने कडक शब्दात बँकेला फटकारले.
‘इलेक्टोरल बाँड्सची सर्व माहिती उघड करावी’ Electoral Bond Hearing ।
यादरम्यान, एसबीआयच्या वतीने वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी सांगितले की, कृपया त्यांना आदेश कसा समजला हे सांगण्याची संधी द्यावी. यावर CJI म्हणाले की, आम्हाला निवडणूक बाँडशी संबंधित सर्व माहिती उघड करायची आहे. तुमच्याकडे जी काही माहिती असेल, ती सर्व काही उघड करावी.” असे आदेश न्यायालयाने यावेळी दिली.
रोहतगी फिक्की,असोचेमच्या वतीने हजर Electoral Bond Hearing ।
या खटल्यात फिक्की आणि असोचेमच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी हजर झाले. यासाठी आपण अर्ज दाखल केल्याचे रोहतगी यांनी सांगितले. मात्र, यावर सरन्यायाधीश म्हणाले की, असा कोणताही अर्ज आमच्याकडे आलेला नाही. सीजेआय म्हणाले की, निकाल दिल्यानंतर तुम्ही येथे आला आहात. आम्ही तुम्हाला आत्ता ऐकू शकत नाही.
2019 पूर्वीचा डेटाही प्रसिद्ध झाला
निवडणूक आयोगाने अलीकडेच राजकीय पक्षांनी सीलबंद कव्हरमध्ये जमा केलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक केली आहे. 12 एप्रिल 2019 पूर्वीच्या कालावधीशी संबंधित तपशील आहेत. या तारखेनंतरचे निवडणूक रोखे तपशील निवडणूक पॅनलने गेल्या आठवड्यात सार्वजनिक केले होते. निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या १२ एप्रिल २०१९ च्या अंतरिम आदेशाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षांनी निवडणूक रोखे डेटा सीलबंद कव्हरमध्ये दाखल केला होता.