कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी चौदा उमेदवारांनी सोळा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकूण एकोणीस उमेदवारांची सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जयश्री चंद्रकांत जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), करुणा धनजंय मुंडे (अपक्ष), संजय भिकाजी मागाडे (अपक्ष), अरविंद भिवा माने (अपक्ष), भारत संभाजी भोसले (अपक्ष), शाहीद शहाजान शेख (अपक्ष), सत्यजित (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष), सुभाष वैजु देसाई (अपक्ष), आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष), मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष) व राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष), शेतकरी संघटनेचे राजेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.