नगर -नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 875 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असल्याची संख्या ही 5 हजार 658 इतकी गेली आहे. संगमनेर, पारनेर तालुक्यांमध्ये रुग्णवाढ कायम आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 6 हजार 590 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज 884 रुग्ण बरे झाले आहेत. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 16 हजार 43 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.27 टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 316, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 309 आणि अँटीजेन चाचणीत 250 रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 15, अकोले 13, जामखेड 12, कर्जत 3, नगर ग्रामीण 18, नेवासा 1, पारनेर 62, पाथर्डी 11, राहाता 4, राहुरी 2, संगमनेर 129, शेवगाव 2, श्रीगोंदा 40, मिलिटरी हॉस्पिटल 3 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड 1 .
इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 7, अकोले 13, जामखेड 1, कर्जत 7, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 13, नेवासा 24, पारनेर 46, पाथर्डी 7, राहाता 9, राहुरी 22, संगमनेर 50, शेवगाव 35, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 27 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 250 जण बाधित आढळून आले. मनपा 1, अकोले 29, जामखेड 9, कर्जत 54, कोपरगाव 20, नगर ग्रामीण 5, नेवासा 25, पारनेर 32, पाथर्डी 16, राहाता 4, राहुरी 9, संगमनेर 15, शेवगाव 1, श्रीगोंदा 27, श्रीरामपूर 1 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, बरे झालेल्या रुग्णामध्ये मनपा 40, अकोले 62, जामखेड 34, कर्जत 57, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 43, नेवासा 25, पारनेर 93, पाथर्डी 74, राहाता 15, राहुरी 36, संगमनेर 196, शेवगाव 56, श्रीगोंदा 111, श्रीरामपूर 21, कॅटोन्मेंट बोर्ड 6 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे.