शिवथर, (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर आ. शशिकांत शिंदे संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रचाराच्या निमित्ताने गाठीभेटी घेत आहेत. मंगळवारी शिवथर, ता.सातारा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ग्रामदेवतेचे दर्शन घेत काढलेल्या प्रचारफेरी दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्विकार केला. यावेळी लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महिला भगिनींनी केलेल्या औक्षण याबद्दल लोकांनी आभार मानले. यावेळी उमेदवार शशिकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून सातारकर जनतेचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद ही नक्कीच विजयाची नांदी ठरेल. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या हिताची कामे करत असताना छत्रपती शिवरायांना आदर्श मानून सामाजिक जीवनातला प्रत्येक दिवस लोकांसाठी खर्च केला. माझ्या हातून शेवटपर्यंत लोकहिताची कामे व्हावीत व त्यातून सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वांचे आशिर्वाद पाठीशी राहावेत, अशी अपेक्षा आ.शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.