IPL 2024, LSG vs MI Match Result : आज (मंगळवार,30 एप्रिल) आयपीएल 2024 मधील 48 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या होम ग्राउंड, एकना क्रिकेट स्टेडियमवरील या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनी पराभव केला आहे. मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 62 धावांची खेळी करत एलएसजीच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
लखनौनं या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. लखनौचा हा सहावा विजय ठरला आहे. तर मुंबईचा हा सातवा पराभव झाला आहे.लखनौ विरुद्धच्या या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं समीकरण आता फार बिकट झालं आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने 19.2 षटकांत 6 गडी गमावून 145 धावा केल्या आणि सामना चार विकेटने जिंकला.
मार्कस स्टॉइनिसने या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने विरोधी संघाविरुद्ध 39 चेंडूत अर्धशतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे दुसरे शतक आहे. मुंबईविरुद्ध तो 45 चेंडूंत 62 धावांची तुफानी खेळी खेळून बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि दोन षटकार आले.याव्यतिरिक्त केएल राहुल याने 28 धावा तर दीपक हुड्डाने 18 धावा केल्या.निकोलस पूरनने नाबाद 14 धावा केल्या.
या सामन्यात मुंबईकङून गोलंदाजीत नुवान तुषाराने आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. एमआयकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 4 षटकात 26 धावा देत 2 बळी घेतले. त्यांच्याशिवाय जेराल्ड कोएत्झी आणि मोहम्मद नबी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना या सामन्यात विशेष व अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.
Innings Break!
A 🔝 bowling performance from #LSG restricts #MI to 144/7
Do you reckon Mumbai Indians can defend this one? 🤔
Chase starts 🔜
Scorecard ▶️ https://t.co/I8Ttppv2pO#TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/NVkFQMEQWY
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2024
एमआयसाठी सर्वाधिक धावा निहाल वढेराने केल्या, ज्याने 41 चेंडूत 46 धावा केल्या, ज्यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. एमआय संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण संघाने 27 धावांच्या आत 4 विकेट गमावल्या. रोहित शर्मा केवळ 4 धावा करून तर सूर्यकुमार यादव 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तसेच कर्णधार हार्दिक पांड्या एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. पण दरम्यान, इशान किशन आणि निहाल वढेरा यांच्यातील 53 धावांच्या भागीदारीने मुंबईला संकटातून सोडवले. मोहसीन खान आणि रवी बिश्नोई यांच्या धारदार गोलंदाजीने एमआयची फलंदाजी हादरली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला केवळ 144 धावाच करता आल्या आहेत.
इशान किशनने 36 चेंडूत 32 धावा केल्या आणि निहाल वढेरासोबतच्या 53 धावांच्या भागीदारीमुळे एमआयच्या मोठी धावसंख्या गाठण्याच्या आशा वाढवल्या होत्या. पण 18व्या षटकात मोहसीन खानने 46 धावांवर वढेराला क्लीन बोल्ड केले आणि पुढच्याच षटकात मोहम्मद नबीनेही आपली विकेट गमावली. टीम डेव्हिड एका बाजूनं क्रीझवर टिकून होता, पण एमआयचे फलंदाज डेथ ओव्हर्समध्ये एलएसजीच्या तंग गोलंदाजीसमोर झुंजत होते. शेवटच्या षटकात टीम डेव्हिडने 17 धावा काढत मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. टिम डेविडने 18 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकारासह नाबाद 35 धावांची खेळी केली.
एलएसजीची दमदार गोलंदाजी….
लखनौ सुपर जायंट्सकडून मोहसीन खानने 4 षटकात 36 धावा देत सर्वाधिक 2 बळी घेतले. त्याने रोहित शर्मा आणि निहाल वढेराला बाद केले. त्यांच्याशिवाय मार्कस स्टॉइनिस, नवीन उल-हक आणि रवी बिश्नोई यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात वेगाने चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवने दमदार पुनरागमन केले. त्याने मोहम्मद नबीच्या रूपाने एक विकेट घेतली, पण त्याचा फिटनेस अजूनही चिंतेचा विषय आहे. दीपक हुडानेही 2 षटके टाकताना एमआयच्या फलंदाजांना त्रास दिला.