हिंगोली – राज्यामध्ये झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर ठाकरे सरकार कोसळले होते. सेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंड पुकारत थेट ठाकरे ब्रँड नाकारत एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या या वादळी घडामोडींमध्ये एक नाव चांगलंच चर्चेचा विषय ठरलं होत. हे नाव आहे आमदार संतोष बांगर यांचं. शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या सुरुवातीला ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगणारे बांगर अचानक शिंदे गटात सामील झाल्याने राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. अशातच आता बांगर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं असून यावेळी त्याच कारण आहे त्यांचा एक व्हायरल व्हिडीओ.
आमदार संतोष बांगर यांनी, चक्क एका व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचं झालं असं की, कामगारांसाठी सरकारने सुरू केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून यावरून बांगर चांगलेच आक्रमक झाले आहेत. मध्यान्ह भोजन योजनेतून कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. संतप्त झालेल्या आमदारांनी या उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन केलं आहे.
मध्यान्ह भोजन योजनेतून कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याकडे बांगर यांनी लक्ष वेधले. एका उपहारगृहाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार बांगर यांचा देण्यात येणाऱ्या अन्न पदार्थांच्या निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. संतप्त झालेल्या बांगर यांनी थेट या उपहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
ज्या कंत्राटदाराला हे मध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम देण्यात आलं आहे, त्याची चौकशी करुन कारवाई करावी, संबंधित अधिकऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणीही बांगर यांनी केली आहे.